सोनीत शेतजमिनीच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:28 IST2021-05-19T04:28:34+5:302021-05-19T04:28:34+5:30

आप्पासाहेब पाटील, रमेश पाटील व प्रतीक पाटील हे नातेवाईक आहेत. दोघांच्यात शेतजमिनीच्या कारणातून वाद आहे. रमेश व मुलगा प्रतीक ...

Sonit beaten up over farm land dispute | सोनीत शेतजमिनीच्या वादातून मारहाण

सोनीत शेतजमिनीच्या वादातून मारहाण

आप्पासाहेब पाटील, रमेश पाटील व प्रतीक पाटील हे नातेवाईक आहेत. दोघांच्यात शेतजमिनीच्या कारणातून वाद आहे. रमेश व मुलगा प्रतीक पाटील हे दोघे आप्पासाहेब पाटील यांच्या शेतात लाकडे टाकते होते. त्यावेळी आप्पासाहेब पाटील यांनी त्यांना येथे लाकडे टाकू नका असे म्हटल्याने दोघांनी त्यांना काठीने मारहाण केल्याची तक्रार आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

---------------------------

देशी दारू विकणाऱ्यास अटक

मिरज : मिरजेत रेवणी गल्लीत देशी दारू विकणाऱ्या रामचंद्र संजय चव्हाण (वय ३१, रा. रेवणी गल्ली, मिरज) यास मिरज शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन हजार ३४० रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे दारू दुकाने बंद असल्याने चव्हाण हा रेवणी गल्लीत देशी दारू विकत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून त्यास पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.

----------------------

मिरजेत दुचाकी चोरी

मिरज : मिरजेतील माजी सैनिक वसाहतीतून दिनेश बाबूराव सुनगार यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याबाबत सुनगार यांनी गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली आहे.

Web Title: Sonit beaten up over farm land dispute