सोनहिरा कारखान्याचे ‘ऊसभूषण’ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:47+5:302021-03-24T04:24:47+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात विक्रमी ऊस उत्पादन ...

सोनहिरा कारखान्याचे ‘ऊसभूषण’ पुरस्कार जाहीर
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या ‘डॉ. पतंगराव कदम ऊस भूषण’ पुरस्कारांची घाेषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी केली.
या पुरस्काराचे वितरण गुरुवार, दि. २५ रोजी कारखान्याच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.
कदम म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एकरी ऊस उत्पादन वाढावे, या उद्देशाने कारखाना व्यवस्थापनाच्या संकल्पनेतून ऊस पीक स्पर्धा आयोजित केली हाेती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून ज्यांचे ऊस टनेज जास्त आले आहे, अशा शेतकऱ्यांना डॉ. पतंगराव कदम ऊस भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
गळीत हंगाम २०१९-२० मध्ये कारखान्यास गळितास आलेल्या स्पर्धेतील सहभागी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून आडसाली हंगामासाठी प्रथम क्रमांक पार्वती परशुराम गोरे (कडेगाव), व्दितीय प्रकाश शंकराव कदम, खेराडेवांगी (येतगाव) आणि तृतीय क्रमांक दत्तात्रय शंकर ननवरे (येवलेवाडी) आणि खोडवा हंगामासाठी प्रथम क्रमांक नितीन शामराव सूर्यवंशी (वांगी), द्वितीय क्रमांक जनार्दन सोना यादव उपाळे (वांगी) या ऊस उत्पादकांना डॉ. पतंगराव कदम ऊस भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव महिंद, संचालक रघुनाथराव कदम, बापूसाहेब पाटील, प्रभाकर जाधव, युवराज कदम, निवृत्ती जगदाळे, सयाजी धनवडे, दिलीपराव सूर्यवंशी, पुरुषोत्तम भोसले, लक्ष्मण पोळ, पंढरीनाथ घाडगे, तानाजीराव शिंदे, जालिंदर महाडिक, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, जगन्नाथ माळी आणि संचालिका सुनीता जगताप तसेच कार्यकारी संचालक शरद कदम, शेती अधिकारी प्रशांत कणसे, ऊसविकास अधिकारी मारुती जाधव उपस्थित होते.