शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: व्यसनाधीन वडिलांचा सतत त्रास, संतप्त मुलाने भर चाैकात केला पित्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:42 IST

पाेलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भर चाैकात काेयत्याने केले सपासप वार

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथे व्यसनाधीन वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुलाने पाेलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भर चाैकात वडिलांवर काेयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश भीमराव पाटील (वय ५४, रा. वशी, ता. वाळवा) असे मृताचे नाव असून हल्ल्यानंतर मुलगा प्रथमेश सुरेश पाटील (२०) स्वत:हून कुरळप पाेलीस ठाण्यात हजर झाला. त्याच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

वशी येथील सुरेश पाटील गावातील एका खासगी दूध संस्थेमध्ये सचिव म्हणून अनेक वर्षापासून काम करत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. या व्यसनातून ते कुटुंबाला सतत त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून १५ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. उभयतांना मुलगा व मुलगी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर आजी-आजोबा दाेन्ही मुलांचा सांभाळ करत होते.

सुरेश पाटील मात्र व्यसनाच्या आहारी जाऊन सतत कुटुंबाला त्रास देत होते. मंगळवार दुपारी ते मद्य प्राशन करण्यासाठी कुरळपला गेले होते. तेथे मद्य प्राशन करून चौकात कट्ट्यावर बसले होते. यावेळी अचानक मुलगा प्रथमेशने समाेर येऊन त्यांच्या मानेवर कोयत्याने सपासप वार केले. ते रक्तबंबाळ झाल्याचे पाहून प्रथमेश जवळच असलेल्या कुरळप पाेलीस ठाण्यात हजर झाला.

गंभीर जखमी झालेल्या सुरेश पाटील यांना तातडीने कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र मानेवरील जखम खोलवर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलगा प्रथमेशवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव करत आहेत.

अखेरच्या श्वासापर्यंत शिवीगाळ

कुरळप येथील पाेलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौकात ही घटना घडली. सुरेश पाटील यांच्या मानेवरील खाेलवर जखम पाहून चौकात जमलेल्या लोकांचे मन हेलावले. अत्यंत गंभीर जखमी असतानाही ते मुलाला अखेरच्या श्वासापर्यंत शिव्या देत होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी