सोमेश्वर मंदिर स्वागत कमानीमुळे आष्ट्याच्या सौंदर्यात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST2021-01-18T04:23:48+5:302021-01-18T04:23:48+5:30
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्था संचलित रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने श्री क्षेत्र सोमेश्वर ...

सोमेश्वर मंदिर स्वागत कमानीमुळे आष्ट्याच्या सौंदर्यात भर
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्था संचलित रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर मार्ग येथे उभारलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्याहस्ते झाले.
यावेळी राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, प्राचार्य विशाल शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, संस्थेचे अध्यक्ष संभाजीराव सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, हणमंतराव सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, रायगड संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष संभाजी सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून किल्लेप्रतापगडाच्या मार्गावरील स्वागत कमानीला साजेशी अशी अत्यंत देखणी शिवशाही स्वागत कमान उभी केल्याने आष्ट्याच्या सौंदर्यात मोलाची भर पडली आहे.
यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, राकेश आटुगडे, रायगड नागरी सहकारी पतसंस्था व रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.
स्वागत संभाजी सूर्यवंशी, किरण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले, तुषार सूर्यवंशी यांनी अभार मानले.
फोटो: १७०१२०२१-आष्टा सत्कार न्यूज
रायगड नागरी पतसंस्था व सेवाभावी संस्थेच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या उद्घाटनप्रसंगी खासदार धैर्यशील माने यांचा संभाजीराव सूर्यवंशी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी, वैभव शिंदे, विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे उपस्थित होत्या.