शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गलेलठ्ठ पगार अन् उसाचे उत्पन्न, गुरुजी उतरले खासगी सावकारीत; सांगलीतील मिरज पश्चिम भागात चित्र 

By हणमंत पाटील | Updated: October 16, 2023 17:46 IST

दर महिन्याला दोन ते पाच टक्के व्याजाने व्यवहार सुरू

सचिन ढोले समडोळी : सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून आता गुरुजींना गलेलठ्ठ पगार मिळत आहे. शिवाय तालुक्यातील गावाजवळ नोकरी असल्याने उसाची उत्पन्नही मिळत आहे. त्यामुळे मिरज पश्चिम भागातील काही गुरुजी (शिक्षक) सुध्दा खासगी सावकारीच्या व्यवसायामध्ये उतरले आहेत. थेट सावकारी अडचणीची असल्याने पत्नी अथवा नातेवाईकांच्या माध्यमातून ते व्याजाने पैसे देत आहेत. दर महिन्याला दोन ते पाच टक्के व्याजाने व्यवहार सुरू आहेत.मिरज पश्चिम भागातील उसाच्या पट्टातील शिक्षकांनी हा नवा उद्योग सुरू केल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे. या भागात मूळचा शेती व्यवसाय आहे. येथून अनेकजण शिकून शिक्षक व प्राध्यापक झाले. यामध्ये नव्याने शिक्षक म्हणून भरती झालेल्यांना पगार नाहीत. पण घरची ऊस शेती चांगली आहे. त्यामुळे ते दुय्यम व्यावसाय करून घर चालवितात. मात्र, पूर्वी शिक्षक व प्राध्यापक म्हणून सुरू झालेले अध्यापक कायमस्वरुपी परमनंट आहेत. त्यांना किमान ६० ते सव्वा लाखांपर्यंत पगार आहेत. त्यात उसाच्या उत्पन्नाची भर पडते. दुसरा कोणता व्यावसाय करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे कोणताही जागावाजा न करता ते महिन्याला दोन ते पाच टक्के व्याजदराने गरजूंना पैसा पुरवत आहेत.गरजूंना हवी असलेल्या रकमेची अंदाज घेऊन काही शिक्षक १० हजारापासून ५० हजार रुपयांची रक्कम व्याजाने देतात. मूळ रक्कम थकीत राहिल्यास वसुलीचा दगादा लावण्यासही ते मागेपुढे पहात नसल्याचे चित्र आहे.

असा चालतो व्यवहार..बँका, पतसंस्थांच्या तुलनेत केवळ तोंड ओळख आहे. गरजू असून आर्थिक पत पाहून मध्यस्थाच्या माध्यमातून व्याजाने पैसे देतात. शिक्षकांबरोबरचा व्यावहार आहे. आपले पैसे बुडणार नाहीत. त्यामुळे मध्यस्थ्यांची ही चांदी होताना दिसत आहे.

 तक्रारदारांनी पुढे यावे : शिवाजीराव गायकवाड ग्रामीण भागातील खासगी सावकारी मध्ये काही अद्यापक सक्रिय असल्याचे जनतेमध्ये दबकी चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर तक्रारदारांची दखल घेऊन त्यांना निश्चितपणे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करून तक्रारदारांनी आमच्या खात्याशी संपर्क साधावे असे आवाहन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक