सोमनिंग बोरामणी राष्ट्रवादीच्या वाटेवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST2021-07-30T04:28:15+5:302021-07-30T04:28:15+5:30

जत : माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक व उमदी गटातील नेते सोमनिंग बोरामणी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत ...

Somaning Boramani on the path of NCP? | सोमनिंग बोरामणी राष्ट्रवादीच्या वाटेवर?

सोमनिंग बोरामणी राष्ट्रवादीच्या वाटेवर?

जत : माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक व उमदी गटातील नेते सोमनिंग बोरामणी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे यांची भेट घेतल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

बोरामणी हे जत तालुक्यातील बेळोंडगी येथील आहेत. ते ग्रामपंचायत व सोसायटीवर अनेकवेळा निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांना करजगी पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र माजी आमदार जगताप यांनी उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळेपासून बोरामणी हे कोणत्याच पक्षात नाहीत. त्यामुळे ओएसडी डफळे व बोरामणी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी त्यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा बँक या कोणत्याही निवडणुकीत संधी देऊ, असे आश्वासन दिले असल्याचे समजते. मात्र बोरामणी हे कार्यकर्त्यांशी विचारविनियम करून, राष्ट्रवादीत प्रवेश करायचा की नाही याबद्दल ठरवणार आहेत.

290721\img_20210728_190142.jpg

सोमनिंग बोरामणी राष्ट्रवादीच्या वाटेवर?

पालकमंत्री ओएसडी डफळे यांच्याशी चर्चा

Web Title: Somaning Boramani on the path of NCP?