खेळाडूंचे विविध प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:42+5:302021-01-19T04:28:42+5:30
बोरगाव : तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी. तालुक्यात व्हॉलिबॉल खेळाला भविष्यात वैभव प्राप्त करून देऊ. तसेच युवकांचे व खेळाडूंचे ...

खेळाडूंचे विविध प्रश्न मार्गी लावणार
बोरगाव : तरुणांना खेळाची आवड निर्माण व्हावी. तालुक्यात व्हॉलिबॉल खेळाला भविष्यात वैभव प्राप्त करून देऊ. तसेच युवकांचे व खेळाडूंचे विविध प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मत युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव (ता. वाळवा) येथे सावकर दादा उद्योग संकुलाच्यावतीने जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रतीक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
स्व.अशोकराव पाटील आण्णा वेलफेअर फाऊंडेशनसाठी पोलीस दल, सैन्य दल भरतीपूर्व सराव करणाऱ्या मुलांसाठी बोरगाव हायस्कूल मैदानावर फिजिकल फिटनेससाठी सराव सेटअप तयार केला आहे. त्याचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. फाऊंडेशनचे संस्थापक मार्गदर्शक धैर्यशील पाटील यांच्या संकल्पनेतून अद्ययावत क्रीडांगण निर्माण करण्यात आले आहे.
प्रतीक पाटील म्हणाले, व्हॉलिबॉल खेळाडू टीम निवड, वेळोवेळी स्पर्धा संयोजन व अन्य उपक्रमासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी संजय पाटील, धैर्यशील पाटील, देवराज देशमुख, माणिकराव पाटील, कार्तिक पाटील, उदयसिंह शिंदे, शिवाजी वाटेगावकर, उल्हास घाडगे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो-१८बोरगाव१
फोटो ओळ : बोरगाव (ता. वाळवा) येथील कार्यक्रमात प्रतीक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धैर्यशील पाटील, संजय पाटील, माणिकराव पाटील, उदय शिंदे, कार्तिक पाटील उपस्थित होते.