शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:17+5:302021-04-03T04:23:17+5:30
फोटो ओळ : प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन भारत क्षीरसागर यांनी आमदार विक्रम सावंत यांना दिले. यावेळी जैनुद्दीन नदाफ, ...

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा
फोटो ओळ : प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे निवेदन भारत क्षीरसागर यांनी आमदार विक्रम सावंत यांना दिले. यावेळी जैनुद्दीन नदाफ, मनोहर येउल, तानाजी टेंगले, गुंडा मुंजे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वीज बिले ग्रामपंचायतीने भरावीत, असा आदेश जिल्हा प्रशासनाने देऊनसुद्धा जत तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी शाळांची वीजबिले भरलेली नाहीत. वीजबिले थकीत असल्याने कनेक्शन बंद होणार आहेत. यासह शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेेेत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे निवेदनाव्दारे केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की. चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतून जास्तीत-जास्त निधी जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांसाठी खर्च करावा. हा नियम असतानाही बऱ्याच ग्रामपंचायतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत.
प्राथमिक शाळेच्या न्यायालयीन प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शाळांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करावी.
यावेळी आमदार विक्रम सावंत यांनी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
निवेदनावर मनोहर येउल, तानाजी टेंगले, उत्तम लेंगरे, गुंडा मुंजे, विष्णू ठाकरे, जैनुद्दीन नदाफ, आर. के. वाघमोडे यांच्या स्वाक्षरी आहेत.