प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:48+5:302021-02-05T07:21:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संबंधित सर्व अधिकारी व संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊ, ...

प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच संबंधित सर्व अधिकारी व संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊ, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.
प्राथमिक शिक्षक संघाने पदवीधर विषय शिक्षकांना इतर जिल्हा परिषदेप्रमाणे पदवीधर वेतनश्रेणी द्यावी, विषय शिक्षकांचे रखडलेली पदाेन्नती प्रक्रिया करावी, निवड श्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी, कायमपणाचे प्रस्ताव, परिवीक्षाधीन कालावधी मंजुरी आदेश तसेच प्राथमिक शिक्षकांचे रखडलेले भविष्य निर्वाह निधी, गट विमा व पेन्शनचे प्रस्ताव तात्काळ निर्गमित करावेत, असे निवेदन डुडी यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, सलीम मुल्ला, फत्तू नदाफ, सुधाकर पाटील, शब्बीर तांबोळी, नितीन चव्हाण, मौलाली शेख, विजय केदार, पासगोंडा पाटील यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फोटो ओळी :- जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सीईओ जितेंद्र डुडी यांना देण्यात आले. यावेळी विनायक शिंदे, अविनाश गुरव, सलीम मुल्ला, फत्तू नदाफ, सुधाकर पाटील उपस्थित होते.