सांगली बाजारपेठेतील पार्किंग समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:33+5:302020-12-09T04:21:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन करून हा ...

सांगली बाजारपेठेतील पार्किंग समस्या सोडवा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहनांच्या पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी महापालिकेने नियोजन करून हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा, अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष विशाल पवार यांनी केली.
याबाबत पवार यांनी उपायुक्तांना निवेदन दिले. यावेळी नगरसेविका भारती दिगडे, नगरसेवक सुब्राव मद्रासी, केदार खाडिलकर, प्रशांत चिपळूणकर, मोहन जामदार, दीपक कर्वे उपस्थित होते. शहरातील पेठभाग, मारुती रोड, हरभट रोड, सराफ कट्टा, कापडपेठ या मुख्य बाजारपेठेत पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. त्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या पाहिजेत. भावे नाट्यमंदिरासमोरच्या जागेत दुचाकीसाठी, तर आनंद चित्रमंदिरच्या मागील जागेत चारचाकी वाहनांसाठी पार्किंग खुले करावे. तेथे आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. गणपती मंदिराजवळील बँकेेचे पार्किंग खुले केल्यास बाजारपेठेतील वाहनांचा ताण कमी होण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.