केंद्रप्रमुख पदभरतीचा प्रश्न सोडवा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:20+5:302021-07-07T04:33:20+5:30
ओळी : प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षक समितीच्या वतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबासाहेब ...

केंद्रप्रमुख पदभरतीचा प्रश्न सोडवा.
ओळी : प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षक समितीच्या वतीने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबासाहेब लाड, सयाजी पाटील, सदानंद यादव उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे त्वरित भरावीत, पदवीधर विषय शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सदानंद यादव, संजय डोंगरे, राजेंद्र लोहार, बाबाजान पटेल, संदीप कांबळे यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. जिल्ह्यातील १३६ मंजूर पदांपैकी जून अखेर ९८ पदे रिक्त आहेत. १० जून २०१४ च्या अधिसूचनेप्रमाणे २९ पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात यावीत. पदवीधर प्राथमिक विषय शिक्षकांना पदावनत करणे, ऑगस्ट २०१४ मधील नियुक्त विषय शिक्षकांना राज्यातील इतर जिल्हा परिषदेने दिलेल्या निकषानुसार सरसकट ग्रेड वेतन ४३०० रुपये लागू करावे, विषय शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना कार्यवाहीबाबत सूचना दिल्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
यावेळी राज्य नेते किरण गायकवाड, शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव, महादेव माळी, संचालक तुकाराम गायकवाड, श्रेणिक चौगुले, शशिकांत बजबळे, राजेंद्र कांबळे, अजित पाटील, संजय रोकडे, आबासाहेब डोंबाळे, म. ज. पाटील उपस्थित होते.