देशसेवा करणाऱ्या जवानांची प्रेरणा घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST2020-12-05T05:03:52+5:302020-12-05T05:03:52+5:30

वाटेगाव : सीमेवर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांची प्रेरणा आजच्या युवकांनी घ्यावी व देशाची सेवा करावी, असे प्रतिपादन सुवर्णपदक ...

The soldiers who serve the country should be inspired | देशसेवा करणाऱ्या जवानांची प्रेरणा घ्यावी

देशसेवा करणाऱ्या जवानांची प्रेरणा घ्यावी

वाटेगाव : सीमेवर देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांची प्रेरणा आजच्या युवकांनी घ्यावी व देशाची सेवा करावी, असे प्रतिपादन सुवर्णपदक विजेते आनंदराव धुमाळ यांनी केले.

वाटेगाव (ता. वाळवा) येथे सशस्त्र सेना झेंडा दिवसानिमित्त आमआदमी सलाम आर्मीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी शहीद जवान सुरेश मुसळे, शहीद जवान झाकीर पठाण यांच्या प्रतिमांचे पूजन निवृत्त सुभेदार थोरात, आनंदराव धुमाळ, अजित साठे, शांताराम साळुंखे यांच्याहस्ते करण्यात आले. शहीद जवानांच्या कुटुंबियांचा व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बर्डे गुरुजी सोसायटीचे अध्यक्ष सचिन बर्डे, सूरज साठे, अक्षय तडाखे, शिवदास बल्लाळ, शिवाजी मुळीक, अस्लम मुल्ला, हारूण मुल्ला, चिंतू साळुंखे, रमेश साठे, शीतल खोत उपस्थित होते.

फोटो- ०२१२२०२०-आयएसएलएम-वाटेगाव न्यूज

फोटो : वाटेगाव (ता. वाळवा) येथे शहीद जवान सुरेश मुसळे व झाकीर पठाण यांना आनंद धुमाळ, ज्ञानदेव थोरात यांनी अभिवादन केले.

Web Title: The soldiers who serve the country should be inspired