सोरडीतील जवानाचे हृदयविकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST2021-05-18T04:28:10+5:302021-05-18T04:28:10+5:30
संख : सोरडी (ता. जत) येथील भारतीय सैन्यदलातील पॅरा कमांडो जवान सचिन नामदेव चाबरे (वय २६) यांचे ...

सोरडीतील जवानाचे हृदयविकाराने निधन
संख : सोरडी (ता. जत) येथील भारतीय सैन्यदलातील पॅरा कमांडो जवान सचिन नामदेव चाबरे (वय २६) यांचे जम्मू-काश्मीर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी परेडला जाण्याची तयारी करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव जम्मूहून बुधवारी गावी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूर्वभागातील सोरडी येथील सचिन चाबरे यांचे गावातच दहावीपर्यंत शिक्षण झाले. बारावीचे शिक्षण संख येथे झाले. आई-वडील ऊसतोडणी मजूर आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते २०१४ मध्ये लष्करात भरती झाले होते.
बेंगलोर येथे १०६ पॅरा कंमाडो बटालियनमध्ये भरती झाले होते. ते जम्मू-काश्मीर येथे कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांचे लग्न झाले आहे. साहस, धाडस आणि चपळता हे त्यांचे विशेष गुण होते. तरुण, उमद्या सैनिकाच्या अशा अकाली जाण्याने परिवार, गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
पार्थिव जम्मूहून बुधवारी गावी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंत्यसंस्काराबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही.