किसान मोर्चा, राष्ट्र सेवा दलातर्फे मिट्टी सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:46+5:302021-04-04T04:26:46+5:30
भारताच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्ली सीमेवर पंजाब, हरियाणा, राजस्थानातील शेतकरी केंद्र शासनाच्या नवीन शेतकरी कायद्याविरोधात ...

किसान मोर्चा, राष्ट्र सेवा दलातर्फे मिट्टी सत्याग्रह
भारताच्या संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्ली सीमेवर पंजाब, हरियाणा, राजस्थानातील शेतकरी केंद्र शासनाच्या नवीन शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली माती विकू देणार नाही असे म्हणत हुतात्मा रामचंद्र सुतार यांचे नातू संजय श्यामराव सुतार यांच्यासह मालगावातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस निर्मला बस्तवडे, उज्ज्वला म्हैशाळे, अमोल चिक्कोडे, यशवंत सावंत, सुभाष माळी, गंगाधर तोडकर, विद्याधर खोलकुंबे यांनी मातीच्या हंड्यात माती भरून शेतकरी आंदोलनास समर्थन दिले. ही माती क्रांतिकारकांच्या त्याग व बलिदानातून घडलेल्या देशभरातील अशा अनेक गावांतून गोळा करून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून व ६ एप्रिलच्या मिठाच्या सत्याग्रहाची आठवण जागी करीत मिट्टी सत्याग्रह कार्यक्रम दिल्ली येथील शेतकरी आंदोलनस्थळी जमा करून स्मृतिस्तंभ उभारण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यातून गोळा केलेली माती घेऊन राष्ट्र सेवा दलाचे सदाशिव मगदूम, बाबासाहेब नदाफ, मिलिंद कांबळे, शहाजी गोगांणे, शाहिस्ता मुल्ला दिल्लीला जाणार आहेत. यावेळी प्रा. सदानंद कबाडगे, तुषार खांडेकर, ॲड. के. डी. शिंदे, सदाशिव मगदूम, किरण कांबळे, दिनकर अदाटे, मोहन देशमुख, परशुराम कुंडले, रोहित शिंदे, शिवाजी दुर्गाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. किरण कांबळे, राज कांबळे, तनुजा सोनवणे, करिना नदाफ, अनिशा इंगोले यांनी संयोजन केले.