शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तारांकित करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:00 IST

सांगली : सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तीन तारांकित (⁠थ्री स्टार) केली जाणार आहेत. राज्यभरातील १२५ वसतिगृहांसाठी १२०० कोटींची तरतूद ...

सांगली : सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे तीन तारांकित (⁠थ्री स्टार) केली जाणार आहेत. राज्यभरातील १२५ वसतिगृहांसाठी १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्रीसंजय शिरसाट यांनी दिली.मिरज व सांगलीत त्यांनी रविवारी मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश खाडे यांच्यासह ‘बार्टी’चे महासंचालक सुरेश वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागीय उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मेघराज भाते आदी उपस्थित होते. शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृहे उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने कार्यवाही केली. भविष्यात भाडेतत्त्वावरील सर्व वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्याचा प्रयत्न आहे. मागासवर्गीय मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया वसतिगृहात घातला जातो, त्यामुळे त्यांना थ्री स्टारप्रमाणे सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाने वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता ठेवावी.आमदार खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत आणण्यासाठी प्रयत्न केला. तेथे अद्ययावत सोयीसुविधांसाठी प्रयत्न केले. मिरज तालुक्यात १७ बौद्ध विहार बांधले. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खासगी जागेत असून, ती शासकीय जागेत आणण्याचा प्रस्ताव सादर करू, त्याला मान्यता द्यावी.

टॅग्स :SangliसांगलीSanjay Shirsatसंजय शिरसाटministerमंत्रीStudentविद्यार्थी