गणपती मंदिरात भाविकांचे सोशल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:28+5:302021-04-01T04:27:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संकष्टीनिमित्त सकाळपासून सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती, मात्र सूरक्षित अंतराचे पालन ...

गणपती मंदिरात भाविकांचे सोशल डिस्टन्सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संकष्टीनिमित्त सकाळपासून सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती, मात्र सूरक्षित अंतराचे पालन करीत भाविकांनी शिस्तीचे दर्शनही घडविले. मंदिर प्रशासनाने यासाठी विशेष दक्षता घेतली होती.
याच महिन्यात अंगारकी संकष्टी होती. त्यावेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मार्चअखेरीस आलेल्या संकष्टीनिमित्त सांगली शहर व परिसरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली होती. बुधवारी त्यामुळे पहाटेपासून भाविक मंदिराकडे येत होते. तरीही सुरक्षित अंतराच्या सूचनांचे पालन भाविक करीत होते. मंदिर प्रशासनाने कोरोनामुळे आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. त्याचे पालन भाविकांनी केले. दिवसभर सांगलीच्या पंचायत गणपती मंदिरात भाविकांची गर्दी होती. सांगलीच्या विश्रामबाग गणपती मंदिरासह हरिपूर येथील बागेच्या गणपती मंदिरातही भाविकांनी शिस्तपालन केलेे.