...तर भाजीपाला, द्राक्षे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात टाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:33+5:302021-04-01T04:27:33+5:30
सांगली : दारू दुकाने, बिअर बार सुरू असून, तेथे नागरिकांची गर्दीही आहे. मात्र, आठवडा बाजारात फारशी गर्दी नसताना ...

...तर भाजीपाला, द्राक्षे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात टाकू
सांगली : दारू दुकाने, बिअर बार सुरू असून, तेथे नागरिकांची गर्दीही आहे. मात्र, आठवडा बाजारात फारशी गर्दी नसताना ते बंद करण्याचा निर्णय का घेतला? यामुळे शेतीमालाचे दर ४० टक्के कमी झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध तातडीने उठवावेत, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. भाजीपाला व द्राक्षे जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात टाकू, असा इशारा त्यांनी दिला.
खराडे म्हणाले, गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे द्राक्षे, भाजीपाला, डाळींब मातीमोल किमतीने विकावी लागली. त्यातून शेतकरी सावरत असतानाच लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा आणि अफवांचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेत द्राक्षे आणि भाजीपाल्याचे दर कमी केले आहेत. द्राक्षे शंभर रुपये चार किलोने विकावी लागत आहेत. आता आठवडा बाजार बंद केल्यामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडला आहे. भाव वाढत नसल्यामुळे शेतकरी शेतीमाल मिळेल, त्या दराला विकत आहेत. जिल्हा प्रशासनाने आठवडा बाजार पूर्वीप्रमाणे सुरु करावेत, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन छेडेल.