शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून भाजपा पलूस-कडेगावची पोटनिवडणूक लढवतोय!; जिल्हाध्यक्षांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 18:05 IST

पलूस-कडेगावची पोटनिवडणूक ताकदीने लढविणार 

कडेगाव (जि. सांगली) : राज्यातील अनेक पोट निवडणुकामध्ये  बिनविरोध करण्याचे संकेत काँग्रेसने पाळलेले नाहीत यामुळे आता पलूस -कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध न करता ताकदीने  लढवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे असे  प्रतिपादन भाजपा चे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणूकीसाठी  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा भाजपचे अधिकृत  उमेदवार म्हणून  अर्ज दाखल करण्यात आला . यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बोलत होते.यावेळी खासदार संजय पाटील ,आमदार शिवाजीराव नाईक ,आमदार सुरेश खाडे,आमदार सुधीर गाडगीळ ,आमदार विलासराव जगताप , माजी मंत्री अजितराव घोरपडे ,अतुल भोसले ,राजाराम गरुड उपस्थित होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख पुढे म्हणाले की ,ही निवडणूक ताकतीने लढवायची असून कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवा करून प्रचार करावा .पलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणूकीच्या प्रचारात  भाजपाची जिल्ह्यातील अखंड टीम  सक्रिय होणार आहे.मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटात एक मंत्री प्रचार सभा घेणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले संग्रामसिंह देशमुख यांना   जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी मिळाली आणि त्यांनी पारदर्शक व कुशल  कारभारातून आपली क्षमता सिद्ध केली आहे .त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे .आता ताकदीने व जिद्दीने निवडणूक लढवून  विजय खेचून आणण्याचा निश्चय भाजप नेते आणि कार्यकर्त्यानी  केला आहे . असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले .

यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले सर्वसामान्य जनता आणि भाजपने  मला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी दिली .या संधीचे सोने करीत जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व आदर्शवत केला .आता विधानसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील .कार्यकर्त्यांवर आमचा भरोसा आहे त्यामुळे निवडणूकीत निश्चितपणे यश मिळणार आहे .असे संग्रामसिंह देशमुख म्हणाले .यावेळी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले संग्रामसिंह देशमुख यांची कार्यकुशलता राज्यस्तरावरील नेत्यांच्या डोळ्यात भरली त्यामूळे त्यांना  उमेदवारी देण्याचा निर्णय  पक्षाने घेतला आहे  .आता तुम्ही फक्त अर्ज भरा बाकी सर्व जबाबदारी नेते आणि कार्यकर्ते सांभाळणार आहेत .असे आमदार शिवाजीराव नाईक  यांनी सांगितले .

यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे , आमदार विलासराव जगताप ,गोपीचंद पडळकर ,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड , यांनी मनोगत व्यक्त केले .यावेळी आटपाडी पंचायत समितीचे सभापती  हर्षवर्धन देशमुख ,भाजपचे तालुकाध्यक्ष हिम्मतराव देशमुख ,धनंजय देशमुख आदींसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी ,नेते व कार्यकर्ते उपस्थित होते .

लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटीलच : पृथ्वीराज  देशमुख मीडियात काहीही उलट सुलट चर्चा  असली तरी सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार संजयकाका पाटील हेच लोकसभेचे उमेदवार असतील तर संग्रामसिंह देशमुख हेच पलूस कडेगाव मतदारसंघात  विधानसभेचे उमेदवार असतील .आमचा पक्ष आमचे  कुटुंब सुसंस्कृत आहे.त्यामुळे आम्ही एकविचाराने वाटचाल करणार भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले .

कॉंग्रेसमुक्त जिल्हा करण्याचा संकल्प : आमदार सुरेश खाडे जसा  कॉंग्रेसमुक्त देश करण्याचा भाजपचा  संकल्प  आहे तसा कॉंग्रेसमुक्त  जिल्ह्या करण्याचा संकल्पही जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केला आहे . आता पलूस कडेगाव मतदारसंघातही कमळ फुलणार आहे असे आमदार सुरेश खाडे म्हणाले .

अण्णा आणि बाबा एकाच नाण्याच्या दोन बाजू :पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दिला आहे याबाबत सूचक टोला लागवताना  संग्रामसिंह देशमुख म्हणाले पृथ्वीराज (बाबा ) देशमुख आणि अरुण (आण्णा ) लाड हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत .

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस