शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सापाच्या ५४ पिलांसाठी सांगलीतील सर्पमित्रांचे `सुईणपण`; कृत्रिमरीत्या अंडी उबवून दिला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:28 IST

५४ पिले सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात

संतोष भिसेसांगली : आजवर हजारो सापांचा सुरक्षित बचाव करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणारे सांगलीतील सर्पमित्र रविवारी (दि. २२) आणखी एका नयनमनोहर प्रसंगाचे साक्षीदार झाले. विरुळा जातीच्या बिनविषारी सापाच्या तब्बल ५४ पिलांना अंड्यातून जन्माला घालण्याचे सुईणपण त्यांनी निभावले. या पिलांना वनविभागाच्या मार्गदर्शनानुसार नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.सांगलीत कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळील पवार कॉलनीत एका शेतात २३ फेब्रुवारी रोजी खत टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खताचा ढिगारा खणत असताना मजुरांना मातीत सुमारे दोन ते तीन फूट खाली साप दिसला. सोबतच्या अंड्यांना वेटोळे घालून तो बसला होता. शेतकरी इराप्पा माळी यांनी याची माहिती सर्पमित्र मंदार शिंपी व मेघदीप कुदळे यांना लगेच दिली. त्यांनी सापाला पकडून अंडीही ताब्यात घेतली.सापाला सोडून दिले, पण अंड्यांचे काय करायचे? हा प्रश्न होता. सापाची अंडी कृत्रिमरीत्या उबवण्याचा अनुभव शिंपी यांना होता. त्यांनी वन विभागाच्या परवानगीने ती घरी नेली. प्लास्टिकच्या एका पारदर्शी बरणीत कोकोपीट व थोडी माती भरून त्यात अंडी ठेवली. तापमान राखण्यासाठी बरणीत दररोज थोडे-थोडे पाणी शिंपडले. अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिलांसाठी बरणीवर दररोज लक्ष ठेवले.अखेर रविवारी (दि. २२) अंड्यांतून ५४ पिले बाहेर आली. एकाही अंड्याचा किंवा पिलाचा मृत्यू झाला नाही. या पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडले. या उपक्रमासाठी परिक्षेत्र वनरक्षक सर्जेराव सोनवडेकर, गणेश भोसले, सचिन साळुंखे, किरण नाईक आदींनी मार्गदर्शन केले.

नैसर्गिकरीत्या जन्माचाच अनुभवमंदार शिंपी यांनी सांगितले की, सामान्यत: पाणी जवळ असलेल्या किंवा ओलाव्याच्या जागी साप अंडी घालतात. ऊन आणि पाणी या दोहोंचे संतुलन साधत अंड्यांचे तापमान नियंत्रित होते. ३५ ते ३७ अंश सेल्सिअस या तापमानाला अंडी फलित होतात. सर्रास साप अंडी घातल्यानंतर निघून जातात. तत्पूर्वी, अंड्यांना योग्य तापमान मिळविण्याचे नैसर्गिक ज्ञान त्यांना असते. हेच तापमान बरणीमध्येही कायम राखण्यात आले.

साप किंवा सापाची अंडी दिसली, की ती नष्ट करण्याचा लोकांचा कल असतो, पण सांगली परिसरात लोकांत जागृती करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यामुळेच या सापाविषयी व त्याच्या अंड्यांविषयी माहिती मिळाली. अंडी नैसर्गिक प्रक्रियेनुसारच उबविण्यात यशस्वी झालो. - मंदार शिंपी, सर्पमित्र, सांगली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli snake rescuers 'midwife' 54 snakelets, hatching eggs artificially.

Web Summary : Sangli snake rescuers successfully hatched 54 baby snakes of the Virula species. The eggs were artificially incubated and the hatchlings were released into their natural habitat with forest department guidance.