आष्ट्यात श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णांना अल्पोपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:53+5:302021-05-23T04:25:53+5:30
आष्टा : येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दररोज सकाळी ...

आष्ट्यात श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णांना अल्पोपहार
आष्टा : येथील श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दररोज सकाळी अल्पोपहार देण्यात येत आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष आमिर फकीर, प्रदीप पाटील, अभिजीत कुलकर्णी, डॉ. प्रकाश आडमुठे, जाकीर फकीर यांनी अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी यांना अंड्याचे ट्रे भेट दिले. रुग्णालयातील रुग्णांना दररोज दोन उकडलेली अंडी देण्यात येत आहेत.
यावेळी विश्वजीत सांभारे, संतोष जोशी, महेश राजगुरू, सुलताना जमादार, प्रसाद ताडे, डॉ. नवनीत सांगले यांची प्रमुख उपस्थित होती.
आमिर फकीर म्हणाले, श्री चॅरिटेबल ट्रस्ट आष्टा शहरात राजकारणविरहित सामाजिक काम करत आहे. महापुरासह कोरोना संकटातही शहरातील नागरिकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहोत.