शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-नागपूर, गुहागर-विजापूर महामार्गांमुळे जिल्ह्यात वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:37 IST

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे.

ठळक मुद्देपुनर्रोपण गेले खड्ड्यात; महामार्गासाठी ४७ हजार झाडांची कत्तल

संतोष भिसे ।सांगली : रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गांसाठी तब्बल ४५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत सुमारे वीस हजार झाडांची तोड केली आहे. त्यांचे पुनर्रोपण किंवा नव्याने वृक्षलागवडीकडे कोणाचेच लक्ष नाही. पर्यावरणप्रेमींमधूनही त्यावर आवाज उठविला जात नसल्याची स्थिती आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा (एनएच १६६) ६६ किलोमीटर भाग व गुहागर-विजापूर (१६६ ई अणि एनएच २६६) महामार्गाचा सुमारे १९0 किलोमीटर भाग सांगली जिल्ह्यातून जातो. रत्नागिरी-नागपूरची रुंदी ९0 फूट व गुहागर-विजापूर ४६ फूट रुंदीचा रस्ता आहे. त्यासाठी दुतर्फा हजारो झाडे तोडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, सामाजिक वनीकरण, स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील झाडे नेस्तनाबूत केली जातील. त्याशिवाय खासगी श्ोतीतील झाडांची संख्याही मोठी आहे.

वृक्षतोडीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या वृक्ष समित्यांची परवानगी अपेक्षित आहे; पण त्यांना नियमाची माहितीही नसल्याचे आढळले आहे. तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी नव्याने पाच झाडे लावण्याची अट आहे. त्यासाठी ठेकेदाराची अनामतही ठेवून घेतली आहे. वृक्ष रुजल्यावर ती परत दिली जाईल; पण सद्य:स्थितीत ठेकेदारांनी कोठेही वृक्षारोपण सुरू केलेले नाही.

१००-२०० वर्षांपूर्वीची झाडेदोन्ही महामार्गांसाठी १७ हजार ७७९ झाडे तोडण्याची परवानगी वनविभागाकडे मागितली आहे. खासगी शेतीतील सुमारे ३० हजार झाडांसाठी कृषी विभागाकडे मूल्यांकनाची विनंती करण्यात आली आहे.

क-हाड, विटा, मिरज, नागज, पलूस, कडेगाव, आष्टा, तासगाव, भिवघाट, जत परिसरातील झाडे तोडली जातील. पैकी मिरज-पंढरपूर मार्गावर वेगाने वृक्षतोड सुरू आहे. बरीच झाडे १००-२०० वर्षांपूर्वीची तसेच संस्थानकाळातील आहेत. ती तोडल्याने अनेक ठिकाणच्या सुंदर कमानी नष्ट झाल्या आहेत. हा रस्ता उजाड बनू लागला आहे.

महामार्गाचे काम गतीने : सांगली जिल्ह्यात मिरज ते भोसेदरम्यान रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे तोडल्याने अशा अनेक नैसर्गिक कमानी इतिहासजमा होत आहेत. दीड-दोनशे वर्षे जुनी वडाची झाडे तोडून त्यांचे ओंडके ठिकठिकाणी टाकले आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्गnagpurनागपूरkonkanकोकणRatnagiriरत्नागिरी