सांगलीतील माळ बंगला येथील पाणीपुरवठा इमारतीचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 10:45 AM2021-04-24T10:45:49+5:302021-04-24T10:47:42+5:30

MuncipaltyCarportaion Sangli : सांगली शहरातील माळ बंगला माधवनगर रोड येथील महानगरपालिकेच्या ५६ एमएलटीमधील पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसच्या इमारतीचा स्लॅब शुक्रवारी सायंकाळी ४ वाजणाच्या सुमारास कोसळला. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. येथे कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. याठिकाणी काम करणारा एक कर्मचारी सुदैवाने वाचला.

The slab of the water supply building at Mal Bangla in Sangli collapsed | सांगलीतील माळ बंगला येथील पाणीपुरवठा इमारतीचा स्लॅब कोसळला

सांगलीतील माळबंगला येथील पाणीपुरवठा करणाऱ्या इमारतीचा स्लॅब कोसळला. (छाया : सुरेंद्र दुपटे)

Next
ठळक मुद्देसांगलीतील माळ बंगला येथील पाणीपुरवठा इमारतीचा स्लॅब कोसळलाकोणतीही जीवीतहानी झाली नाही

संजयनगर/ सांगली : शहरातील माळ बंगला माधवनगर रोड येथील महानगरपालिकेच्या ५६ एमएलटीमधील पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसच्या इमारतीचा स्लॅब शुक्रवारी सायंकाळी ४ वाजणाच्या सुमारास कोसळला. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. येथे कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. याठिकाणी काम करणारा एक कर्मचारी सुदैवाने वाचला.

लोकमत मध्ये या पंपीग हाऊसच्या इमारतीची दुरवस्था झाल्याचे वृत्त व छायाचित्रे प्रसिध्द झाले होते. यावेळी लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. याप्रकरणी महापालिकेने गांभीर्य न दाखवल्याने आज हा प्रकार घडल्याचे नागरिकांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त कापडणीस यांनी तत्काळ येथील इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यावे आणि कोणकोणत्या इमारती धोकादायक आहेत त्याचा अहवाल मागवून पुढील अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
 

 

Web Title: The slab of the water supply building at Mal Bangla in Sangli collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.