शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

सांगलीतील कडेगावात रंगला गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:21 IST

हिंदू मानकऱ्यांनी दाखविला सर्व धर्मांचा समन्वय

कडेगाव (जि.सांगली) : कडेगावच्या रस्त्यांवर रविवारी सकाळी पावसाच्या सरी सुरू होत्या, पण त्या सरींमध्ये न भिजणारा जाज्वल्य उत्साह ओथंबून वाहत होता. कडेगावात मोहरमच्या ताबूत भेटीचा ऐतिहासिक सोहळा रंगला होता. हजारो भाविकांच्या साक्षीने, डोळ्यांचे पारणे फेडणारी गगनचुंबी ताबुतांची मिरवणूक आणि भव्य मिलन भेटी सोहळा यंदाही व थाटात पार पडला. ‘महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकार,’ ‘हिंदू-मुस्लीम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे,’ अशा घोषणांनी शहराचा आसमंत दुमदुमून गेला.कडेगावचा मोहरम केवळ धार्मिक अनुष्ठान नसून, तो सामाजिक सलोखा, धार्मिक ऐक्य आणि राष्ट्रप्रेमाचा जिवंत पुरावा आहे. गेली दीडशे वर्षे ही परंपरा जपली जाते. यंदाच्या मोहरम मिरवणुकीने ही परंपरा नव्याने उजळून निघाली. पडत्या पावसातही शिस्तबद्ध आणि सुसंवादात्मक पद्धतीने ताबूत मिरवणुका सुरू झाल्या. सकाळी कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, निमसोड, सोहोली येथून वाजतगाजत मानकरी दाखल झाले.मानाचा ‘सातभाई’ ताबूत उचलण्यात आल्यानंतर वीजबोर्ड, पाटील चौक आणि सुरेशबाबा देशमुख मोहरम मैदान या प्रमुख ठिकाणी विविध मानाच्या ताबुतांची भव्य भेट झाली. देशपांडे, हकीम, बागवान, शेटे, अत्तार, इनामदार, सुतार, माईणकर यांचे उंच, आकर्षक ताबूत गर्दीत लखलख चमकले. त्या भेटीचा क्षण म्हणजे साक्षात ‘राम-भरत’ भेटीसारखा हृदयात थेट झंकार उमटवणारा. भाविकांनी आकाशात टोपी-फेटे उंचावत स्वागत केले.

हिंदू मानकऱ्यांनी दाखविला सर्व धर्मांचा समन्वयताबुतांची ‘गळाभेट’ पाहताना पावसात चिंब झालेले भाविक डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर श्रद्धेचे तेजोवलय घेऊन थक्क होऊन पाहत राहिले. मुख्य भेटीच्या मैदानात ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ या गीतांतून राष्ट्रीय ऐक्याची साक्ष दिली. हिंदू मानकऱ्यांनी मसूद माता, बारा इमाम पंजे ताबूत आणून साऱ्या धर्मांचा समन्वय दाखविला.