मिरजेत आशा होमिओपॅथीकमध्ये त्वचा आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:46+5:302021-04-03T04:23:46+5:30

शिबिरात विविध आजार व विशेषतः त्वचा विकारावर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आशा होमिओपॅथीक क्लिनिकचे संचालक ...

Skin health camp at Miraj Asha Homoeopathic | मिरजेत आशा होमिओपॅथीकमध्ये त्वचा आरोग्य शिबिर

मिरजेत आशा होमिओपॅथीकमध्ये त्वचा आरोग्य शिबिर

शिबिरात विविध आजार व विशेषतः त्वचा विकारावर सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आशा होमिओपॅथीक क्लिनिकचे संचालक डॉ . बी. एस. भोसले यांनी दिली. होमिओपॅथीकतज्ज्ञ डॉ. भोसले यांनी कर्करोग, वंध्यत्व, साखर, मतिमंद व गतिमंद, त्वचाविकार यांसह विविध आजारांवर यशस्वी होमिओपॅथीक उपचार केले आहेत. मिरजेतील छत्रपती शिवाजी रोडवर बँक ऑफ इंडियाशेजारी प्रशस्त आशा होमिओपॅथीक क्लिनिकमध्ये दररोज अनेक शहरातील रुग्ण उपचारासाठी येतात. उन्हाळ्यात अनेकांना त्वचा विकार उद्भवतो. त्वचेची ॲलर्जी, इसब, पिंपल, सोरायसीस, फंगल इन्फेक्शन, पिगमेंटेशन, नागीण, त्वचा कर्करोग आदी त्वचा विकार मुळापासून बरे होण्यासाठी होमिओपॅथी उपचार पध्दती प्रभावी ठरत आहे. यासाठी आशा होमिओपॅथीक क्लिनिकतर्फे आयोजित आरोग्य शिबिरात सवलतीच्या दरात नोंदणी व माफक दरात औषधे दिली जाणार आहेत. शिबिराचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. बी. एस. भोसले यांनी केले आहे.

Web Title: Skin health camp at Miraj Asha Homoeopathic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.