एस.के. होर्तीकर यांचा वाढदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:57+5:302021-09-06T04:29:57+5:30
उमदी : सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव व महात्मा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस.के. होर्तीकर यांचा वाढदिवस रविवारी कोरोनाच्या ...

एस.के. होर्तीकर यांचा वाढदिवस साजरा
उमदी : सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव व महात्मा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस.के. होर्तीकर यांचा वाढदिवस रविवारी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्राचार्य एस.के. होर्तीकर यांना अनेक शिक्षणप्रेमींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या, तसेच सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक, माध्यमिक हायस्कूल व ज्युनियर कॉलेज समतानगर व महात्मा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी दुरध्वनीवरून, तर काहींनी प्रत्येक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
आर.डी. सातपुते, विठ्ठल चव्हाण, प्रा.सोमशेखर धायगुडे, डॉ.गजानंद गुरव, डॉ.सुशांत बुरकुले, डॉ.नातू राठोड, विश्वनाथ राठोड, गोरखनाथ राठोड, हिरालाल राठोड, अर्जुन नाईक, देवा जादव, अप्पू किट्टद, हणमंत वाघ, विठ्ठल सातपुते, भोईते एन.बी. सावंत, प्रा.डी.सी. बासरगाव, प्रा.एस.सी. जमादार, ईसुफ कोरबु, मनोहर चव्हाण आदींसह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.