शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

सांगली महापालिका प्रसुतिगृहातून सहा खाटा झाल्या गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:17 IST

सांगली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू केला.

ठळक मुद्देसांगली महापालिका प्रसुतिगृहातून सहा खाटा झाल्या गायब, संतापजनक प्रकार नगरसेवक थोरात यांच्या प्रयत्नामुळे खाटांचा शोध

सांगली : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहातील सहा खाटा तीन वर्षांपासून गायब आहेत. त्यामुळे प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. ही बाब निदर्शनास येताच राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या खाटांचा शोध सुरू केला. आमराई, कुपवाडमधील कार्यालयांसह अन्य ठिकाणी या खाटा आढळून आल्याने संतप्त झालेल्या थोरात यांनी प्रशासनाला धारेवर धरत या खाटा पुन्हा प्रसुतिगृहात हलविण्यास भाग पाडले.महापालिकेच्या प्रसुतिगृहातील तीन खाटा आमराईतील विश्रामधाममध्ये लेखापरीक्षणासाठी आलेल्या लेखापरीक्षकांना देण्यात आल्या होत्या. त्या खाटा तीन वर्षांपासून तेथे होत्या. दोन खाटा निवडणुकीदरम्यान वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी अन्य विभागांकडे हलविल्या होत्या. एक खाट महिला बालकल्याण विभागाकडे देण्यात आली होती. यामुळे रुग्णालयात खाटांअभावी रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत होते.याबाबत थोरात म्हणाले, सांगलीच्या प्रसुतिगृहाचे कामकाज केवळ दहाजणांवर सुरू आहे. या रुग्णालयात दोन प्रसुती विभाग तज्ज्ञ आहेत. मिरजेत तर तज्ज्ञही नाहीत. दोन्ही ठिकाणची आॅपरेशन थिएटर धूळ खात पडली आहेत. मिरजेतील आॅपरेशन थिएटरवरील पत्रे गायब आहेत. तेथे जाळी बसविण्यात आली आहे.

औषधांचाही पुरवठा व्यवस्थित केला जात नाही. त्यात प्रसुतिगृहातील खाटाच गायब करण्याचा प्रकार प्रशासनाकडून झाला आहे. ही बाब निदर्शनास येताच डॉ. कवठेकर, डॉ. सुनील आंबोळे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांना घेऊनच गायब खाटांची शोधमोहीम सुरू केली.

या खाटा आमराई, कुपवाड येथून कुलपे तोडून महापालिकेच्या रुग्णवाहिकेद्वारे परत आणल्या. रुग्णालयातील खाटा गायब होणे, हा प्रकार लाजिरवाणा आहे. आरोग्य विभागाचा असा कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीhospitalहॉस्पिटल