शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शासकीय नोकरीच्या आमिषाने सहा जणांना ८७ लाखांचा गंडा, पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: October 5, 2023 19:36 IST

सांगली : शासकीय विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सहा जणांना तब्बल ८६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ...

सांगली : शासकीय विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सहा जणांना तब्बल ८६ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अभिषेक पांडुरंग खंडागळे (रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांनी सौरभ शंकर पाटील (वय ३०) आणि त्याचे वडील शंकर रामचंद्र पाटील (६०, रा. विठाईनगर, बालाजीनगर, सांगली) यांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आमची वरिष्ठ पातळीवर चांगल्या ओळखी असून, त्याद्वारे नोकऱ्या लावतो, असे आमिष संशयितांनी दाखविले होते. फसवणूक झालेल्यांमध्ये पौर्णिमा तुषार पवार, पूजा झेंडे (रा. झेंडे गल्ली, कवलापूर), संग्राम वसंतराव सोनवणे (रा. वल्लभनगर, पुणे), विनायक उदय नागावे, शुभम उदय नागावे, महेश पाटील यांचा समावेश आहे. ५ मार्च २०१५ ते दि. ४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फसवणूक झालेल्या सर्वांशी संपर्क साधून संशयितांनी शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. संशयित पाटील पिता-पुत्रांनी सहा जणांकडून ऑनलाईन तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे घेतले. त्यांनी पैसे देऊनही त्यांच्या नोकरीचे काम झाले नव्हते. याबाबत ते वारंवार पाठपुरावा करत होते.पाठपुरावा करूनही नोकरी मिळत नाही आणि पैसेही परत मिळत नाहीत, हे समजल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाटील पिता-पुत्राकडे पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी धमकी देत शिवीगाळ केल्याचेही खंडागळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. विश्रामबाग पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस