शिराळ्यात सहा लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST2021-03-27T04:28:33+5:302021-03-27T04:28:33+5:30

शिराळा : येथील गुरुवार पेठेतील सुधीर विश्वासराव जाधव यांच्या घरातील चौदा तोळे सोने, चांदी तसेच रोख चाळीस हजार रुपये ...

Six lakh burglary in Shirala | शिराळ्यात सहा लाखाची घरफोडी

शिराळ्यात सहा लाखाची घरफोडी

शिराळा

: येथील गुरुवार पेठेतील सुधीर विश्वासराव जाधव यांच्या घरातील चौदा तोळे सोने, चांदी तसेच रोख चाळीस हजार रुपये असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवार, दि. २६ रोजी सायंकाळी सहाच्या अगोदर घडली आहे.

येथील मुख्य बाजारपेठेत सुधीर जाधव यांचे घर आहे. गेली काही दिवस ते इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यामुळे घर बंद होते. दि.२७ रोजी त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे, म्हणून त्यांच्या पत्नी माया पैसे नेण्यासाठी सायंकाळी सहाच्या दरम्यान घरी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घर उघडले असता तिजोरी उघडी दिसली.

ही तिजोरी उघडून पाहिल्यावर त्यांना रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी ठेवलेले ४० हजार रुपये, सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, गंठण, अंगठी, साखळी आदी चौदा तोळे सोने तसेच चांदीचे दागिने असा अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. मात्र सुधीर जाधव रुग्णालयात असल्याने नेमके काय चोरीस गेले आहे याची माहिती मिळालेली नाही.

पोलिसांना कळविले असता उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, शिवाजी पाटील, महेश साळुंखे, विनोद पाटील, रणजित ठोमके यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

Web Title: Six lakh burglary in Shirala