चिकुर्डेसह सहा आरोग्य केंद्रांत कंत्राटी कर्मचारी भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:57+5:302021-08-28T04:30:57+5:30
सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डेसह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर केली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह अन्य ...

चिकुर्डेसह सहा आरोग्य केंद्रांत कंत्राटी कर्मचारी भरणार
सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डेसह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर केली आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सभापती आशाताई पाटील यांनी दिली.
आशाताई पाटील म्हणाल्या की, चिकुर्डे, वाटेगाव (ता. वाळवा), नागज (ता. कवठेमहांकाळ), लेंगरे (ता. खानापूर), मुचंडी (ता. जत) व वांगी (ता. कडेगाव) या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन्ही पदे मंजूर केली आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये अन्य कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर आहेत. शासकीय पदे उपलब्ध होईपर्यंत कंत्राटी पध्दतीने शासनाच्या सूचनेनुसार भरण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेअंतर्गत पहिला डोस ११ लाख २३ हजार १४९ व दुसरा डोस चार लाख ७१ हजार २०० एवढ्या लाभार्थ्यांचे लसीकरण केले आहे. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील ६९.५८ नागरिकांना पहिला डोस, तर दुसरा डोस ४३.२३ टक्के नागरिकांना दिला आहे.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.