येळापुर आरोग्य केंद्रासाठी जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:44+5:302021-05-13T04:27:44+5:30
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास चार कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून, या वर्षाच्या ...

येळापुर आरोग्य केंद्रासाठी जागेची पाहणी
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास चार कोटी दहा लाख रुपये मंजूर झाले असून, या वर्षाच्या अखेरीस या कामास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
येळापूर (ता. शिराळा) येथे नियोजित आरोग्य केंद्राच्या जागा पाहणीवेळी ते बोलत होते.
आमदार नाईक म्हणाले, येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून चार कोटी दहा लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. मात्र, येळापूर येथे केंद्रासाठी आवश्यक असणारी जागा असूनही काही अडचणीमुळे शासनाकडे ती लवकर वर्ग न झाल्याने थोडा वेळ लागला होता.
यावेळी दिनकर दिंडे, राजू खांडेकर, रघुनाथ लोहार, आकाराम पाटील, लक्ष्मण वाघमारे, भीमराव पाटील, शिवाजी पाटील, शंकर पाटील, संभाजी पाटील, अक्षय कडोले, ग्रामसेवक सतीश पाटील, आदी उपस्थित होते.