जतमध्ये व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:19 IST2021-07-20T04:19:34+5:302021-07-20T04:19:34+5:30
जत येथील प्रमुख बाजारपेठेत स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक, सराफ, भांडे, कापड दुकाने बंद आहेत. तरीही दुकानदारांना दुकानाचे भाडे, वीजबिल, कामगारांचा पगार, ...

जतमध्ये व्यापाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
जत येथील प्रमुख बाजारपेठेत स्टेशनरी, इलेक्ट्रॉनिक, सराफ, भांडे, कापड दुकाने बंद आहेत. तरीही दुकानदारांना दुकानाचे भाडे, वीजबिल, कामगारांचा पगार, बँकेचे कर्ज द्यावे लागत आहे. शहरातील व्यापारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करीत आले आहेत. यामुळे आम्हाला आमची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही जत तहसीलदार कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी यावेळी दिला.
असोसिएशन जतचे अध्यक्ष किरण बिज्जरगी म्हणाले की, प्रशासनाने आम्हाला १९ जुलैपासून दुकाने उघडण्यास सहकार्य करू असे अश्वासन दिले होते. परंतु प्रशासनाने आपले आश्वासन पाळले नाही. प्रशासनाला कोरोनाच्या नावाखाली गोरगरीब दुकानदारांना छळायचे आहे.
आंदोलनात नगरसेवक ईराण्णा निडोणी, पांडुरंग बामणे, प्रकाश बंडगर, जितेंद्र पाचंगे यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते. या आंदोलनाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांनी पाठिंबा दिला.
190721\img-20210719-wa0066.jpg
जतमधील व्यापाऱयांचे जत तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन