शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भावाच्या भेटीआधीच बहिणीवर काळाचा घाला; रस्ता ओंलाडताना दुचाकीची धडक, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:56 IST

आष्टा : आष्टा - सांगली मार्गावर भावाला भेटायला जाताना रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी ...

आष्टा : आष्टा - सांगली मार्गावर भावाला भेटायला जाताना रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पार्वती सदाशिव माने (वय ५८, रा. पोखले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना ७ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत आष्टा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सात मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार्वती माने या चव्हाणवाडी आष्टा येथील कृष्णा जानकर या भावाला भेटायला निघाल्या होत्या. आष्टा - सांगली रस्ता ओलांडून त्या आपल्या भावाच्या घराकडे येत असताना दुचाकी क्रमांक (एम.एच. ०९ डी.जी. ७९९२) वरील चालक मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे याने त्यांना जोराची धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. मोरेश्वर महंकाळे याने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला. डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांना सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना पार्वती माने यांचे निधन झाले. भावा- बहिणीची भेट होण्याअगोदरच काळ आला. पार्वती माने यांचे बंधू कृष्णा बाबू जानकर (रा. आष्टा) यांनी दुचाकी चालक मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे (रा. डांगे कॉलेज मागे, आष्टा) याच्या विरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आष्टा पोलिस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू