एकाच पावसाने सांगली झाली चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:22+5:302021-02-20T05:15:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ड्रेनेजसाठी केलेली खुदाई, खराब रस्ते, मुरुमीकरणाची रखडलेली कामे यामुळे सांगली शहरात एकाच पावसाने दैना ...

A single rain made Sangli muddy | एकाच पावसाने सांगली झाली चिखलमय

एकाच पावसाने सांगली झाली चिखलमय

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ड्रेनेजसाठी केलेली खुदाई, खराब रस्ते, मुरुमीकरणाची रखडलेली कामे यामुळे सांगली शहरात एकाच पावसाने दैना उडाली. शहराच्या विस्तारित भागातील रस्ते चिखलाने माखल्याने ते वाहतुकीसाठी बंद झाले. नागरिक, वाहनधारकांना त्यामुळे कसरत करावी लागली.

सांगलीच्या शंभर फुटी रस्त्याच्या दक्षिणेकडील उपनगरांमध्ये, आकाशवाणीसमोरुन शंभरफुटीच्या पश्चिमेकडील उपनगरांत, शंभर फुटी रस्त्यावरील साई मंदिर चौकात, सांगली सिव्हिल हॉस्पिटल चौक ते शंभरफुटी रस्ता, जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, लक्ष्मीनगर, लक्ष्मीनगर ते माधवनगर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता, शिवोदयनगर आदी भागात चिखलाने रस्ते माखले आहेत. जुना बुधगाव रस्त्यावरील उपनगरे, लक्ष्मीनगर, शिवोदयनगरमधील रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले होते. सकाळी शाळा व क्लासेसना जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे हाल झाले. अनेकांची वाहने चिखलात अडकली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. काहीठिकाणी केवळ मुरुम व मातीचे रस्ते आहेत. अशा सर्वठिकाणी दलदल निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. ड्रेनेजसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. हे रस्ते पूर्ववत डांबरी करावेत, अशी मागणी लक्ष्मीनगर येथील नागरिकांनी गुरुवारी केली.

चौकट

महापालिकेची सकारात्मक भूमिका

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यापूूर्वी ड्रेनेजची कामे पूर्ण झालेल्या अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करून दिले आहे. याबाबत महापालिकेची सकारात्मक भूमिका दिसून येत आहे, मात्र येत्या दोन महिन्यांत म्हणजेच पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: A single rain made Sangli muddy