कोविड रुग्णांसाठी अंधांचे गीत गायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:28+5:302021-06-10T04:18:28+5:30

मिरज : तासगाव येथे ‘आम्ही तासगावकर’ कृती समितीच्या कोविड रुग्णालयात कोविड रुग्णांच्या मनोरंजनासाठी अंध गायकांनी नॅब ...

Singing blind songs for covid patients | कोविड रुग्णांसाठी अंधांचे गीत गायन

कोविड रुग्णांसाठी अंधांचे गीत गायन

मिरज : तासगाव येथे ‘आम्ही तासगावकर’ कृती समितीच्या कोविड रुग्णालयात कोविड रुग्णांच्या मनोरंजनासाठी अंध गायकांनी नॅब संचलित ‘स्वरगंधा’ ही संगीत मैफल सादर केली.

ज्येष्ठ विचारवंत डाॅ. बाबुराव गुरव यांच्या ७२व्या वाढदिनी अंधांसाठी काम करणाऱ्या नॅबच्या सांगली शाखेचे सचिव उदय माने व अंध गायक श्रीकांत सावंत यांनी नॅब संचलित ‘स्वरगंधा’ संगीत मैफल सादर केली.

गायक श्रीकांत सावंत व सहकलाकार प्रशांत कोपार्डे, के. अजेश, गायिका रश्मी सावंत यांनी गाण्यांच्या बहारदार कार्यक्रमाने कोविड रुग्णांना मंत्रमुग्ध केले. ‘झिंग झिंग झिंगाट’ या गीतावर रुग्णांनी नृत्याचा आनंद घेतला. यावेळी अंध कलावंताना प्रमाणपत्र देण्यात आले. डाॅ. विवेक गुरव, शरद शेळकू, फारुक गवंडी, संदेश भंडारे, पांडुरंग पाटील यावेळी उपस्थित होते. योसेफ आवळे यांनी संयोजन केले.

Web Title: Singing blind songs for covid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.