शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

आंध्रातील सिंघम सुमित गरुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:24 IST

सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा ...

सांगली : सांगलीच्या मातीत घडलेल्या कर्तृत्ववान माणसांनी आपल्या कामाचा ठसा नेहमीच उमटविला आहे. मग तो कोणत्याही क्षेत्रात असो अथवा कोणत्याही प्रदेशात. आपल वेगळपण या मातीने नेहमीच जपले आणि ते वेगळेपण इथल्या माणसांमध्ये रुजवले आहे. याची साक्ष मिळते, ती इस्लामपूर येथील मूळचे रहिवासी असणारे व सध्या आंध्र प्रदेशमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुमित गरुड यांच्यामुळे. एका बाजूला आपल्या अधिकाराने गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी धडाकेबाज सिंघम अधिकारी, तर दुसऱ्या बाजूला आपल्या सहकाऱ्यांविषयी अनोखे उपक्रम राबवून जबाबदार नेतृत्वाची भूमिका बजाविणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली आहे.

दहावीत ९५.०६ टक्के गुणांनी कोल्हापूर विभागात प्रथम; बारावीत ९६ टक्के गुणांसह बोर्डात सहावा; मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण आणि २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन करत आयपीएस होण्याचा मान. असा हा शैक्षणिक प्रवास संपल्यानंतर सुमित गरुड यांनी आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेला आंध्र प्रदेशमधून सुरुवात केली. विजयनगरम्, विशाखापट्टणम्‌ येथे सेवा बजावत सध्या ते काकीनाडा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये अवैध वाळू उपसा आणि दारू व्यवसायाला चाप लावण्यासाठी तेथील सरकारने मोजक्याच अधिकाऱ्यांवर विशेष मोहीम राबविली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये सुमित गरुड यांची निवड करण्यात आली आहे. धडाकेबाज कामगिरी, रोखठोक भूमिका यामुळे गरुड यांनी आंध्र प्रदेश पोलीस प्रशासनात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामुळेच या मोहिमेमध्ये त्यांना संधी मिळाली आहे. गत काही दिवसांमध्ये त्यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये स्वत:ची जरब निर्माण केली आहे.

या कामगिरीबरोबरच त्यांनी पोलीस प्रशासनातील महिला कर्मचाऱ्यांसाठीही विशेष उपक्रम राबवत, त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. ‘वनिता वनी’ या नावाने हा उपक्रम असून, याअंतर्गत महिला कर्मचाऱ्यांच्या कामातील विविध समस्या, काैटुंबिक अडचणी, शारीरिक समस्या याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठीही पाऊल उचलले आहे.