शासकीय योजनातून ग्रामविकास साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:23 IST2020-12-23T04:23:15+5:302020-12-23T04:23:15+5:30

शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून गावाचा विकास साधावा, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले. हुतात्मा नगर ...

Simple rural development through government scheme | शासकीय योजनातून ग्रामविकास साधा

शासकीय योजनातून ग्रामविकास साधा

शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून गावाचा विकास साधावा, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले.

हुतात्मा नगर (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सरपंच सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विलास जाधव व सांगलीच्या पोलीस निरीक्षक निर्मला माने या होते.

मुख्याध्यापक बी. के. नायकवडी यांनी स्वागत; किरण शिंदे यांनी प्रास्ताविक केले. एस. ए. गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी हुतात्मा नानकसिंग विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो-२२वारणावती०१

फोटो ओळ - हुतात्मा नगर येथे हुतात्मा नानकसिंग विद्यालयात विलास जाधव यांच्या हस्ते वसंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निर्मला माने, बाळासाहेब नायकवडी उपस्थित होते.

Web Title: Simple rural development through government scheme