शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र

By संतोष भिसे | Updated: July 8, 2025 19:19 IST

मिरज, आटपाडी, जत, तासगाव, शिराळ्यात काटा लढतीची चिन्हे, खानापुरातही राजकीय अस्तित्वाच्या लढती

संतोष भिसेसांगली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच विविध राजकीय पक्षांनी मैदान मारण्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल आठ वर्षांनी निवडणुका होत असल्याने बरीच गणिते नव्याने जमवावी लागणार आहेत. विशेषत: या कालावधीत बरीच राजकीय समीकरणे बदलली असल्याने राजकीय पक्षांना नव्याने पट मांडावा लागणार आहे.गेल्या आठ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन भाग झाले. साहजिकच त्यांनाही सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. नव्याने राजकीय रिंगणात आलेल्या पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकद आजमावण्याची संधी मिळाली आहे. अर्थात, जिल्हा परिषदेवर आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेच सत्ता गाजवल्याचा इतिहास आहे. सध्या या पक्षांतील अनेक महत्त्वाचे मोहरे भाजप आणि शिंदेसेनेत आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय करिष्मा उमेदवार निवडून आणण्यासाठी फायद्याचा ठरणार का? याची उत्सुकता असेल.जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी भाजपसह महायुती ताकद लावणार हे निश्चित आहे. महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला एकसंधपणे लढत द्यावी लागेल. पण गेल्या आठवडाभरातील उद्धवसेना-मनसे युतीच्या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या एकसंधतेविषयी चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका युती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात होते. पण त्यामध्ये मनसे कोठेही नव्हती.आता महायुतीचा एक भाग असलेल्या उद्धवसेनेने मनसेसोबत हातमिळवणी केल्याने काँग्रेसच्या पातळीवर नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अशीच स्थिती राहिल्यास जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी एकत्र राहील का? याची उत्सुकता असेल. अर्थात, जिल्हा परिषदेत मनसे आणि उद्धवसेनेचे अस्तित्व नाही. त्यामुळे त्यांची युती काँग्रेस कितपत गांभीर्याने घेणार याकडे लक्ष असेल.

मिरजेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्केकाँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून अद्याप टिकून असलेल्या मिरज तालुक्यात जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाने गणिते बदलण्याची शक्यता आहे. अर्थात, अनेक काँग्रेसजनांनी जयश्री पाटील यांच्या मागे न जाता मदन पाटील म्हणून स्वत:चा गट शाबूत ठेवला आहे. या गटाची भूमिका मिरज तालुक्यात निर्णायक असेल.

आटपाडी, शिराळ्यात टशन आटपाडीत राजकीय वर्चस्व राखून असलेले राजेंद्रअण्णा देशमुख सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर तानाजी पाटील शिंदेसेनेचे नेतृत्व करतात. शिवाय तालुक्यात पडळकर गटही जोरात आहे. त्यामुळे या तालुक्यात टशन होणार हे स्पष्ट आहे. शिराळ्यातही भाजप, राष्ट्रवादीमध्ये (शरदचंद्र पवार) जोरदार लढत होणार हे निश्चित आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक हे विधानसभेतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी व आपला गट पुन्हा बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेला ताकद लावू शकतात.

तासगावमध्ये टोकाच्या लढतीतासगाव तालुक्यात विधानसभेला पीछेहाट झालेले माजी खासदार संजय पाटील यांना आपली ताकद वाढविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीला संघर्ष करावा लागणार आहे. तर रोहित पाटील यांना विधानसभेची लाट कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कवठेमहांकाळ, जत, पलूस, वाळवा आदी तालुक्यांतही महाविकास आघाडी व महायुतीमध्येच लढती रंगणार आहेत. खानापुरातील बाबर आणि पाटील गटांत राजकीय अस्तित्वाच्या लढती रंगणार आहेत.