आष्ट्यात एमआयडीसीसाठी सह्यांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:25+5:302021-09-15T04:31:25+5:30
आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे बहू उद्देशीय सेवाभावी संस्था व सहयोगी संस्थेतर्फे आष्टा येथे औद्योगिक वसाहात व्हावी, या मागणीला ...

आष्ट्यात एमआयडीसीसाठी सह्यांची मोहीम
आष्टा : येथील बापूसाहेब शिंदे बहू उद्देशीय सेवाभावी संस्था व सहयोगी संस्थेतर्फे आष्टा येथे औद्योगिक वसाहात व्हावी, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांच्या सह्याची मोहीम राबविण्यात आली.
नेते मंडळी राजकीयदृष्ट्या आष्ट्याला महत्त्व देतात. पण विकासापासून या शहराला दूर ठेवले आहे. बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेकडून गतवर्षी कोल्हापूर येथील कारखानदारांनी बैठक आष्टा येथे आयोजित केली होती.
या मोहिमेमध्ये नागरिक, महिला, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी विजय कदम, आब्बास लतीफ, डी. एस. कोळी, जालिंदर पाटील, बाबासाहेब औताडे, सुर्यकांत चुडेकर, राहुल थोरात, श्रीराम ढोले, जयसिंग चव्हाण, इम्रान मणेर, सागर माळी, तोहीद ईनामदार, संग्राम शिंदे, अशोक मदने, वसंत कांबळे, शहाजान जमादार, गणेश टोमके आदी उपस्थित होते.
फोटो : आष्टा येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी आयोजित सह्यांच्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी विजय कदम, संग्राम शिंदे, अशोक मदने, शहाजान जमादार, अब्बास लतीफ, डी. एस. कोळी, श्रीराम ढोले आदी उपस्थित होते.