मिरजेतून काँग्रेसतर्फे सिद्धार्थ जाधव

By Admin | Updated: September 25, 2014 00:30 IST2014-09-25T00:17:04+5:302014-09-25T00:30:28+5:30

पतंगराव कदम : मदन पाटील, सदाशिवराव पाटील यांच्यावरही शिक्कामोर्तब

Siddharth Jadhav from Mirage to Congress | मिरजेतून काँग्रेसतर्फे सिद्धार्थ जाधव

मिरजेतून काँग्रेसतर्फे सिद्धार्थ जाधव

दिपक मोहिते, वसई
वसईच्या सीमेवर असलेली वजे्रश्वरीदेवी ही ठाणे व मुंबई परिसरातील भक्तांची आराध्य दैवत असून दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिराच्या न्यासातर्फे विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वजे्रश्वरीदेवी मंदिराचा परिसर हे पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
वजे्रश्वरी देवीच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला एखाद्या किल्ल्यावरच जात आहोत असे वाटते. वजे्रश्वरी मातेचे मंदिर आजुबाजूच्या तटबंदी व बुरूजांमुळे किल्ल्यासारखेच वाटते. या मंदिराची रचना अतिशय सुुुंदर केली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडप, गाभारा व मुख्य गाभारा असे तीन टप्पे आहेत. मुख्य गाभाऱ्यात देवीच्या सुंदर मुर्ती आहेत. या मंदिरात मध्यभागी वजे्रश्वरी माता उजच्या बाजूला रेणूका माता व डाव्या बाजूला कालिका मातेची भव्य मुर्ती आहे. यामुर्तीवरती चांदीचे छत्र असून नवरात्रीच्या दर दिवशी भरजरी वस्त्रांनी मुर्ती सजविली जातात. या मंदिरात या मुर्तीव्यतीरिक्त महालक्ष्मी, परशुराम, गणपती, मोरबादेवी यांचीही स्थापना करण्यात आली आहे.
वजे्रश्वरी मंदिराना पौराणीक व ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे. त्रेता युगात भगवान इंद्राने आपले वज्र ऋषीमुनीवर फेकले. या वज्राच्या आघातापासून संपुर्ण मानवजातीला वाचवण्यासाठी वशिष्ठ ऋषींनी भगवान शंकर व पार्वतीला हाक मारली. पार्वती मुनींच्या हाकेला धावून आली. आणि तीने इंद्राचे वज्र गिळले व माता पार्वती वजे्रश्वरी माता म्हणून तेथे स्थानापन्न झाली.
अशी आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भही तेवढाच महत्वाचा आहे. १९६० पर्यंत वसई, तारापूर, माहिम, दमण व इतर किल्ले पोर्तूगिजांच्या ताब्यात होते. पोर्तूगिजांचा अन्याय सहन न झाल्यामुळे येथील नागरीकांनी पेशव्यांना मदत करण्याचे साकडे घातले. यावेळी पेशव्यांनी चिमाजीआप्पांना वसईच्या स्वारीवर पाठविले. चिमाजीआप्पांनी वजे्रश्वरी मातेकडे यशाची प्रार्थना केली. जर यश मिळाले तर मी तुझे मंदिर किल्ला स्वरूपात बांधेण. त्यानुसार चिमाजी आप्पांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर वजे्रश्वरी मातेचे मंदिर बांधून वजे्रश्वरीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाची आठवण म्हणून मंदिरासमोर दिपस्तंभ व दिपमाळा उभारण्यात आल्या आहेत. नागरीकांना दर्शन घ्यायचे असल्यास भिवंडी ते गणेशपुरी अशी एस. टी. सेवा आहे.

Web Title: Siddharth Jadhav from Mirage to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.