सिद्धार्थ व शिवम जाधव यांची राज्य हॉकी संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:02+5:302021-04-05T04:23:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी खा. एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा हॉकी ...

Siddharth and Shivam Jadhav selected in the state hockey team | सिद्धार्थ व शिवम जाधव यांची राज्य हॉकी संघात निवड

सिद्धार्थ व शिवम जाधव यांची राज्य हॉकी संघात निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी खा. एस. डी. पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा हॉकी खेळाडू सिद्धार्थ जाधव आणि आदर्श बालक मंदिर व निशिकांतदादा पाटील स्पोर्टस् फौंडेशनचा हॉकी खेळाडू शिवम जाधव याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या सब ज्युनिअर संघात निवड झाली आहे. सिद्धार्थ जाधव याला चॅरिटेबलचे मार्गदर्शक संजय पाटील, मनोज भाेरे, धनंजय राऊत, अनिल शिंदे, संजय चरापले, संजय चव्हाण, संजय कबुरे यांचे मार्गदर्शन लाभले, तर संस्थेचे मानद सचिव बी. एस. पाटील, सहसचिव धैर्यशील पाटील यांनी सिद्धार्थ जाधव यांचे अभिनंदन केले. तुजळाभवानी शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत देशपांडे, मुख्याध्यापक बी. बी. जाधव यांनी शिवम जाधवचे अभिनंदन केले.

Web Title: Siddharth and Shivam Jadhav selected in the state hockey team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.