राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शुभम कारंडेला ‘सुवर्णपदक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST2021-09-25T04:26:56+5:302021-09-25T04:26:56+5:30
ओळ : कुकटाेळी (ता. कवठेमहांकाळ) येथे शुभम् कारंडे याचा नामदेव बडरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संपत्ती येळकर, ...

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शुभम कारंडेला ‘सुवर्णपदक’
ओळ : कुकटाेळी (ता. कवठेमहांकाळ) येथे शुभम् कारंडे याचा नामदेव बडरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संपत्ती येळकर, नामदेव भालके, आदी उपस्थित हाेते.
कवठेमहांकाळ : हरियाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील शुभम आबा कारंडे याने सुवर्णपदक मिळविले.
स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने नुकत्याच रोहतक (हरियाणा) येथे राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रातून ३८ किलो वजन गटात शुभम कारंडे याने पहिल्या स्थानावर राहत रोहतक येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. त्याने ३८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत हरियाणाच्या मल्लास चितपट करीत सुवर्णपदक मिळविले.
या कामगिरीबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेते वस्ताद नामदेव बडरे यांच्या हस्ते शुभम कारंडे याचा कुकटोळी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल गिड्डे, कुस्ती प्रशिक्षक संपत्ती येळकर, नामदेव भालके, संजय चव्हाण, सतीश वाघमोडे, प्रदीप जाधव, पोलीस अधिकारी सरदार नाळे, पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, सतीश पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.