श्रीकृष्ण मोहिते यांचे शिक्षण क्षेत्रातील याेगदान माेठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:27+5:302021-02-07T04:24:27+5:30
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत ...

श्रीकृष्ण मोहिते यांचे शिक्षण क्षेत्रातील याेगदान माेठे
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात कदम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आ. मोहनराव कदम अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. विक्रम सावंत, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, भारती बँकेचे संचालक डॉ. जितेश कदम, डॉ. नितीन नायक, मालन मोहिते, सरपंच विजय मोहिते उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. श्रीकृष्ण मोहिते व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते यांचा विश्वजीत कदम व मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. कदम म्हणाले, पतंगराव कदम व मोहनराव कदम यांना चांगल्या माणसांची पारख होती. त्यामुळेच त्यांनी प्रा. श्रीकृष्ण मोहिते व मालन मोहिते यांना सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय केले. उभयतांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले. विशेषतः त्यांनी गावाशी असलेली नाळ तोडली नाही.
प्रा. श्रीकृष्ण मोहिते म्हणाले, भारती विद्यापीठ ही फक्त संस्था नाही तर ते एक कुटुंब आहे. भारती विद्यापीठ व कदम कुटुंबीयांनी माझ्यावर फार मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपविली. ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम केले.
मालन मोहिते म्हणाल्या. माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील महिलेला कदम कुटुंबियांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी दिली. हे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
यावेळी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या प्राप्त अनुदानातून उभारलेल्या नेटवर्किंग लॅब व इन्स्ट्रुमेंटेमेशन लॅबचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी स्वागत केले. यावेळी प्रा. पद्माकर जगदाळे, प्रा. ए. एल. जाधव, दत्तात्रय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक हरीदास पाटील, प्रा. संजय ठिगळे, प्रा. राम पवार, प्रा. सूर्यकांत बुरुंग यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रभा पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०६०२२०२१-विटा-भारती विद्यापीठ ०१ किवा ०२
ओळ : सांगली येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्रा. श्रीकृष्ण मोहिते आणि मालन मोहिते यांचा सेवानिवृतीनिमित्त कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विक्रम सावंत, डॉ. जितेश कदम, डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, विजय मोहिते उपस्थित होते.