कामेरी येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:01+5:302021-01-13T05:11:01+5:30

कामेरी : डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व छगनबापू गर्ल्स विद्यालय कामेरी येथे श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन ...

Shri Swami Vivekananda Jayanti Week begins at Kameri | कामेरी येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाची सुरुवात

कामेरी येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाची सुरुवात

कामेरी : डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व छगनबापू गर्ल्स विद्यालय कामेरी येथे श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. १२ जानेवारीपासून या जयंती सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एस. आर. पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद तर मुख्याध्यापक एस. बी. जाधव यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या जयंती साप्ताहात कोरोना जंतूंसंसर्गामुळे यावर्षी क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. फक्त निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व स्पर्धा ऑनलाइन होणार असून विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाचा व्हिडिओ सादर करावयाचा आहे तर निबंध व चित्र घरूनच काढून आणावयाची आहेत. ५ ते ७ लहान आणि ८ ते १० मोठा अशा २ गटात या स्पर्धा होणार आहेत. एस. के. मगदूम, एस. जी. गुरव, श्रीमती ए. डी. पेडणेकर, श्रीमती समीक्षा पाटील, डी. बी. पाटोळे, माणिक माने, राजेंद्र जेडगे उपस्थित होते.

फोटो : १२०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज १

ओळ : कामेरी येथे एस. आर. पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी विवेकानंद तर मुख्याध्यापक एस. बी. जाधव यांनी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

Web Title: Shri Swami Vivekananda Jayanti Week begins at Kameri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.