श्रावणामुळे फुलांचा बाजार बहरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:29+5:302021-08-13T04:30:29+5:30
कोरोना निर्बंधामुळे बंद असलेला मिरजेतील फुलांचा बाजार सुरू झाल्यानंतर फुलांची आवक झाली सुरू आहे. लग्नसराईचा हंगाम गेल्यानंतर आता श्रावण ...

श्रावणामुळे फुलांचा बाजार बहरला
कोरोना निर्बंधामुळे बंद असलेला मिरजेतील फुलांचा बाजार सुरू झाल्यानंतर फुलांची आवक झाली सुरू आहे. लग्नसराईचा हंगाम गेल्यानंतर आता श्रावण महिन्यात फुलांना मागणी आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाब, जरबेरा कार्नेशिया या फुलांचे उत्पादन घेण्यात येते.
दररोज २०० ते २५० बाॅक्स हरितगृहातील फुले मिरजेतून रेल्वेने बाहेर पाठविली जातात. स्थानिक बाजाराच्या तुलनेत मोठ्या शहरात मागणी व दर जास्त असल्याने त्या ठिकाणी फुले पाठविली जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत मार्चपासून आठ महिने रेल्वेवाहतूक बंद असल्याने दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरात फुलांची निर्यात ठप्प होती. गेल्या तीन महिन्यांपासून काही एक्स्प्रेस सुरू झाल्याने दिल्ली, मुंबई व बंगलोरला डच गुलाब, जरबेरा या हरितगृहातील फुलांची मागणी होत आहे. मात्र, कर्नाटक सीमा बंद असल्याने कमी फुले जात आहेत. गेले चार महिने बंद असलेल्या मिरजेतील फुलांच्या बाजारात पुन्हा उलाढाल सुरू झाली आहे.
चौकट
फुले उत्पादकांना दिलासा
लाॅकडाऊन व अनलाॅक काळात या फुलांना मागणी नसल्याने व निर्यात बंद असल्याने शेतकरी हवालदिल होते. नदीकाठावरील फूल उत्पादक शेतकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. मात्र, आता श्रावण महिना सुरू झाल्याने मागणी व दरात वाढ झाल्याचे फुलांचे व्यापारी पंडित कोरे यांनी सांगितले.
चाैकट
फुलांचे प्रतिकिलो दर
निशिगंध २५० रुपये
शेवंती ५० रुपये
गुलाब २५० रुपये शेकडा
जरबेरा १०० रुपये पेंडी
गलांडा ८० रुपये
झेंडू ४० रुपये