शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र धुवाँधार पाऊस; इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 14:45 IST

Sangali : बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. इस्लामपूरमध्ये चोवीस तासात ११० मिलिमीटर तर सांगलीत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सांगली : जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धूवाँधार पाऊस झाला. चोवीस तासातील आकडेवारीनुसार इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणच्या नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढली असून काहीठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत.

बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. इस्लामपूरमध्ये चोवीस तासात ११० मिलिमीटर तर सांगलीत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 

शिराळा, पलूस, कडेगाव व मिरज तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेकठिकाणी नद्या, नाल्यांवरील रस्ते पाण्याखाली गेले. नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी रातोरात मोठ्या प्रमाणात वाढली. सांगली, मिरज शहरे जलमय झाली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली आहे. गुरुवारी कमाल तापमान २८ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले. नदीपातळीतही वाढ होत असून सांगलीतील पाणीपातळी सध्या ७ फुटांवर गेली आहे.

धरणांमधील साठ्यात मोठी वाढचोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्यामुळे एकूण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. कोयना धरणात चोवीस तासांत २.९६ टी.एम.सी.ने तर वारणा धरणात १.५१ टी.एम.सी. पाणीसाठा वाढला. कोयना धरण क्षेत्रात १९२ मिलिमीटर तर वारणा धरण क्षेत्रात ९७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे.

पावसाचे जिल्ह्यातील चित्रसांगली, मिरज शहरे जलमय झाली. शिराळा तालुक्यात येळापूर ते समतानगर मार्गावरील पूल बुधवारी रात्रीपासून पाण्याखाली गेला. कडेगाव तालुक्यात चिंचणी तलावात पाणी वाढल्याने येथील एक आपत्कालीन दरवाजा उघडण्यात आला.वाळवा तालुक्यात वाटेगाव येथील भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ वाळवा तालुक्यातील तिळगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.आटपाडी व जत तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे.

जिल्ह्यातील पाऊस मि.मी.(चोवीस तासातील नोंद)सांगली ८१.८मिरज ५१.५तासगाव ४४कवठेमहांकाळ १५.८शिराळा ६४.५कडेगाव ५९.८पलूस ५३.५विटा २६.५आटपाडी ७.८जत ३.२

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस