महाराष्ट्राची मान उंचावेल असे कर्तृत्व दाखवा

By Admin | Updated: March 24, 2015 00:19 IST2015-03-23T22:54:53+5:302015-03-24T00:19:39+5:30

सुबोध भावे : व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी संवाद

Showcase the power of Maharashtra's glory | महाराष्ट्राची मान उंचावेल असे कर्तृत्व दाखवा

महाराष्ट्राची मान उंचावेल असे कर्तृत्व दाखवा

इस्लामपूर : मुला—मुलींना शिकविताना आई—वडिलांनी खूप मोठी स्वप्ने बघितलेली असतात. त्यासाठी रात्रं—दिवस ते कष्ट घेतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले शिकावे, चांगला माणूस बनून चांगले काम करुन दाखवावे. प्रत्येक मराठी विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान उंचावेल, अशी कामगिरी करा, असे आवाहन प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे यांनी केले.पेठनाका (ता. वाळवा) येथील व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या वनश्री नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. संस्थेचे सचिव राहुल महाडिक, संचालक व जि. प. सदस्य सम्राट महाडिक, प्राचार्य महेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी भावे यांची प्रकट मुलाखत घेत त्यांचे बालपण, शिक्षण ते अभिनयापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविला. प्राचार्य जोशी यांनी परिचय करून दिला.
यावेळी संस्थेचे सचिव राहुल महाडिक म्हणाले की, या शिक्षण संकुलात तीन हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. अभियांत्रिकीची पदवी घेणारी पहिली बॅच बाहेर पडत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. येत्या दोन वर्षात विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सभागृह उभारणार आहोत. यावेळी प्रा. संतोष वाडकर, प्रा. सी. बी. पाटील, प्रा. आशुतोष साळुंखे, प्रा. व्ही. ए. कापसे, सुजित थोरात, गाईड कांबळे यांची उपस्थिती होती. विद्यापीठ प्रतिनिधी दिनेश धुमाळ याने आभार मानले. (वार्ताहर)

पदवीसाठी शिक्षण नकोयावेळी बोलताना भावे म्हणाले की, सध्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्या वेगाने तुम्ही माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान आत्मसात करीत आहात, तेवढीच आव्हानेसुध्दा आहेत. शिक्षणाचा वापर केवळ पदवी मिळविण्यापुरताच ठेवू नका, तर त्याचा उपयोग समाज उभारणीसाठी कसा होईल, या दृष्टिकोनातून पाहा.

Web Title: Showcase the power of Maharashtra's glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.