शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीवर चढून आता आंदोलन करावे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:27 IST

water shortage Sangli -सांगली महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. उपनगरात तर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आम्हीही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे का? अशा शब्दांत बुधवारी ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. महापौर गीता सुतार यांनी पंपिंग वाढवून लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली.

ठळक मुद्देपाण्याच्या टाकीवर चढून आता आंदोलन करावे का?सांगलीत अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांचा संताप

सांगली : महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. उपनगरात तर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आम्हीही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे का? अशा शब्दांत बुधवारी ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. महापौर गीता सुतार यांनी पंपिंग वाढवून लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली.महापालिकेच्या सभेत नगरसेविका नसीमा नाईक यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. शामरावनगरमधील पाण्याबाबत नागरिक, महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले, तेव्हा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. पण आठवडा लोटला तरी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

भाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले की, सदस्यांनी आंदोलन करूनही प्रश्‍न सुटत नाहीत हे गांभीर्याने घेतले पाहिजे. यामुळे लोकांच्या रोषाला सदस्यांना सामोरे जावे लागते. खालची यंत्रणा काम करत नाही. अधिकाऱ्यांना अभ्यास नाही, थातूरमातूर उत्तरे देतात, असा आरोप केला.विश्रामबाग, वारणाली परिसरासाठी पाण्याची टाकी बांधण्याच्या निर्णयाला महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ पाण्याच्या टाक्‍या उभारून काय उपयोग? टाक्‍या असल्या तरी पाणीपुरवठा का होत नाही, असा सवाल नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील यांनी उपस्थित केला. माने यांनी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने पाण्याचे नियोजन होत नसल्याचा आरोप केला.

पाण्याच्या टाक्‍या असूनही उपसा यंत्रणा सक्षम नसल्याने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे संतोष पाटील म्हणाले. त्यात सुधारणा झाली नाही तर आम्हालाही टाक्‍यांवर चढून आंदोलन करावे लागेल असे ते म्हणाले. यावर पंपिंग वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश महापौर सुतार यांनी दिले.आयुक्तांचा रोषआयुक्त कापडणीस यांनीही अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. ते म्हणाले, आयुक्त उत्तरे देतात म्हणून अधिकारी निष्काळजी झाले आहेत. ते गाफील राहतात. विभाग प्रमुख, सहायक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागाच्या बैठका घेतल्यावर बरेचसे प्रश्‍न सुटतील. त्यांनी अभ्यास करावा, अशी सूचना केली.

टॅग्स :water shortageपाणीकपातMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली