यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा विचार नको
By Admin | Updated: February 9, 2015 01:11 IST2015-02-09T01:10:26+5:302015-02-09T01:11:56+5:30
गायक राहुल देशपांडे यांचे मत

यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा विचार नको
पणजी : गोव्यातील रसिकांना तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटकांचे खेळ पाहण्याची संधी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा व कला अकादमीने उपलब्ध करून दिली आहे. या संस्थांतर्फे दि. १० ते १४ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत ‘भारत रंग महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन दीनानाथ मंगेशकर कलामंदिर, पणजी येथे होणार आहे. आयोजकांतर्फे सुरेश भारद्वाज यांनी ही माहिती दिली. त्यांनी तसेच कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर, बी. एस. मराठे यांनी कला अकादमी येथील ज्युरी कक्षात रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.
देशभर विविध शहरानंतर यंदा प्रथमच गोव्यात हा महोत्सव होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ७ वाजता नामवंत रंगकर्मी प्रा. सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी कला व संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्रा. अब्दुल लतीफ खटाना अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
महोत्सवातील नाट्यप्रयोग नाट्यरसिकांसाठी प्रवेशिकेद्वारे खुले असून प्रत्येक नाट्यप्रयोगाच्या विनामूल्य प्रवेशिका दि. ८ फेब्रुवारी २०१५ पासून रोज सकाळी ११ वा. ते दु. १ वा. व दु. २ वा. ते सायं. ४ वाजेपर्यंत कला अकादमीत प्रथम येणाऱ्यास प्रथम या तत्त्वावर उपलब्ध असतील. काही आसनव्यवस्था राखीव राहील. आठ वर्षांखालील मुलांना नाट्यप्रयोगास प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे नाट्यप्रयोगाचे छायाचित्रण व व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे.
(विशेष प्रतिनिधी)