आरवडेत शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:50+5:302020-12-05T05:04:50+5:30

आरवडे येथील सुभाष चव्हाण व प्रकाश चव्हाण यांच्या शेतातील उसाच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीस शॉर्टसर्किट होऊन दुपारी १२ च्या ...

A short circuit in Aravada burnt two acres of sugarcane | आरवडेत शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

आरवडेत शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळाला

आरवडे येथील सुभाष चव्हाण व प्रकाश चव्हाण यांच्या शेतातील उसाच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीस शॉर्टसर्किट होऊन दुपारी १२ च्या दरम्यान उसाला आग लागली. या आगीत दोघांचा ऊस व ठिबकचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दुसऱ्या घटनेत गावालगत असणाऱ्या मारुती चव्हाण व संदीप चव्हाण यांच्या उसाच्या शेतावरून जाणाऱ्या विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. यामध्ये २० गुंठे ऊस जळून खाक झाला. यात ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. दोन्ही ठिकाणी गावातील तरुणांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यामुळे शेजारी असणारे ऊस प्लॉट वाचविण्यात यश आले. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

फोटो : ०२ मांजर्डे १

ओळ :

आरवडे (ता. तासगाव) येथे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला ऊस.

Web Title: A short circuit in Aravada burnt two acres of sugarcane