चेंबर ऑफ कॉमर्समार्फतही दुकाने सुरू ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:09+5:302021-04-09T04:29:09+5:30

सांगली : येत्या तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी निर्बंधांबाबत अपेक्षित निर्णय न घेतल्यास राज्यभरात चेंबर ऑफ कॉमर्समार्फत दुकाने सुरू करण्याचा निर्णय ...

The shops will also continue through the Chamber of Commerce | चेंबर ऑफ कॉमर्समार्फतही दुकाने सुरू ठेवणार

चेंबर ऑफ कॉमर्समार्फतही दुकाने सुरू ठेवणार

सांगली : येत्या तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी निर्बंधांबाबत अपेक्षित निर्णय न घेतल्यास राज्यभरात चेंबर ऑफ कॉमर्समार्फत दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी राज्य उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रातील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सर्व अध्यक्षांची ऑनलाइन बैठक गुरुवारी पार पडली. राज्य शासनाने सध्या जे निर्बंध व्यापाऱ्यांवर घातले आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यभरातील सर्व अध्यक्षांनी या निर्बंधास विरोध दर्शविला. राज्य शासनाने महिनाभर दुकाने बंद ठेवण्याबाबत घेतलेला निर्णय अन्यायी आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे व्यापारी यात उद्ध्वस्त होतील. राज्यातील व्यापार क्षेत्रास हा निर्णय घातक असल्याने शासनाने तो मागे घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केली.

सुरेश पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या राज्यातील शिष्टमंडळास दोन दिवसांत निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील. याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी मी चर्चा करणार आहे. चेंबर ऑफ कॉमर्सची भूमिका त्यांच्यासमोर मांडण्यात येईल. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांशी बोलून व्यापाऱ्यांच्या भावना चांगल्या पद्धतीने मांडतील, हा विश्वास आहे. सरकारने जर अपेक्षित निर्णय घेतला नाही तर सर्व व्यापार पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्यातही दुकाने सुरू करू.

Web Title: The shops will also continue through the Chamber of Commerce